टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा आज समारोपाचा दिवस आहे. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच सर्वश्रेष्ठ योगदान दिलं. यावेळी भारताने 7 पदक जिंकले जे की, स्वत:चा एक रेकॉर्ड आहे. याआधी 2012 ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 6 पदकं जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने पदकाचे खाते उघडले. तिने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकलं. यानंतर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कास्य, लवलिना बोर्गोहेन हिने बॉक्सिंगमध्ये कास्य, रवी दाहियाने कुस्तीत रौप्य तर भारतीय पुरूष हॉकी संघाने कास्य पदक जिंकलं. यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने कास्य तर अखेरीस नीरज चोप्रा याने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं.
ऑलिम्पिकमध्ये टॉप 3 खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक देण्याची परंपरा सेंट लुइस 1904 ऑलिम्पिकपासून सुरूवात झाली. ऑलिम्पिकमचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते. खेळाच्या या महाकुंभ मेळ्यात देण्यात येणाऱ्या सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची किंमत रुपयात करता येत नाही. कारण हे पदक खेळाडूंना कठोर मेहनत, त्यागाबद्दल मिळते. तुम्हाला कल्पना आहे का ही पदक कशी बनवली जातात. जाणून घ्या ही पदक कशी बनतात आणि त्याची खरी किंमत किती असते.
सुवर्ण पदक हे ऑलिम्पिकमधील सर्वात मोठं पदक आहे. हे विश्व चॅम्पियनपेक्षा कमी नाही. सुवर्ण पदकाचे वजन 556 ग्रॅम इतके असते. पण यात 6 ग्रॅमच सोने असते आणि इतर चांदी असते. याची किंमत भारतीय रुपयात 65 हजार 790 रुपयाच्या आसपास आहे.
रौप्य पदकाचे वजन 550 ग्रॅम असतं. हे पदक संपूर्ण चांदीने बनलेले असते. याची जाडी 7.7 मिमी पासून 12.1 मी पर्यंत आहे. याची बाजारातील किंमतीची तुलना केल्यास ती 36 हजार 630 रुपये इतकी होते. कास्य पदकाचे वजन 450 ग्राम असते. यात 428 ग्रॅम कॉपर असते. याशिवाय यात झिंक आणि टिनचे देखील काही प्रमाण असते. याची किंमत 500 रुपयाच्या जवळ आहे.