महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympic 2020 : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय पुरूष हॉकी संघाचा दारुण पराभव - Tokyo Olympics updates

टोकियो ऑलिम्पिक 2020
टोकियो ऑलिम्पिक 2020

By

Published : Jul 25, 2021, 9:02 AM IST

Updated : Jul 26, 2021, 10:10 AM IST

19:33 July 25

टोक्यो ऑलिम्पिक : रोवर्स अर्जुन आणि अरविंदचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन, सेमीफायनलमध्ये धडक

टोक्यो - अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह यांनी रविवार टोक्यो टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यासोबतच ऑलिम्पिकच्या इतिहासात रोविंगमध्ये आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.  सी फॉरेस्ट वाटरवे वर रेपेचेज राउंडमध्ये भारतीय जोडीने 6:51.36 ची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. 

18:45 July 25

पिस्टलमध्ये तांत्रिक खराबीमुळे फायनलमध्ये पोहचण्याचे मनु भाकरचे स्वप्न भंगले

ओलंपिकच्या 10 मीटर एयर पिस्टल इवेंटमध्ये पदकाची प्रबळ दावेदार भारतीय नेमबाज मनु भाकरसाठी आजचा दिवस खराब राहिला. पिस्टलमध्ये तांत्रिक खराबीमुळे ती किरकोळ अंतराने फायनलमध्ये जागा बनवण्यासाठी अपात्र ठरली व क्वालिफाइंग राउंडमध्येच बाहेर पडली. मनु भाकरने या इव्हेंटमध्ये चांगली सुरुवात करताना पहिल्या फेरीत 98 अंक मिळवले होते.  
 

18:20 July 25

जलतरण : श्रीहरी नटराज आणि मान पटेल उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी

टोकियो ऑलिम्पिक: जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि मान पटेल उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. युवा भारतीय जलतरणपटू श्रीहरि नटराज रविवारी टोकियो ओलंपिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर बैकस्ट्रोक सेमीफायनलसाठी क्वालीफाय करण्यात अपयशी ठरला. श्रीहरीने पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक हीट 3 मध्ये 54.31 सेकंदाची वेळ नोंदवली. 

17:22 July 25

नेमबाज - पुरूष स्कीट शूटिंग स्पर्धेत अंगद वीर बैजवाने 10वे  तर मेराज अहमदने 25वे स्थान पटकावले.  

16:44 July 25

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

हॉकी: ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. भारताविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ७-१ असा फरकाने सहज जिंकला. 

16:07 July 25

जलतरणपटू माना पटेल सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात अपयशी

भारताची जलतरणपटू माना पटेल महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक हीटमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली. ती सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरली. 

15:43 July 25

बॉक्सर मनिष कौशिकचा एकतर्फा पराभव

भारतीय पुरूष बॉक्सर मनिष कौशिकचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्या फेरीतच संपूष्टात आले. ग्रेट ब्रिटनचा बॉक्सर ल्यूक मॅककॉरमॅक याने मनिषचा 4-1 असा एकतर्फा पराभव केला.  

14:22 July 25

मेरी कोम शानदार सुरूवात

बॉक्सिंग - मेरी कोमने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सुरूवात केली. मेरीने  राउंड ऑफ 32 मधील सामना 4:1 च्या फरकाने जिंकला. तिचा पुढील सामना 29 जुलै रोजी कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंरिसाय व्हिक्टोरिया हिच्याशी होणार आहे.  

13:36 July 25

मनिका बत्राचा शानदार विजय

टेबल टेनिस - मनिका बत्राने शानदार विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. तिने संघर्षपूर्ण सामन्यात युक्रेनच्या मार्गार्टा पेसोत्स्काचा पराभव केला.  

12:38 July 25

जिम्नॅस्टिक्स प्रणती नायकचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपूष्टात

भारताची आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स प्रणती नायकला ऑल राउंड फाइनल फेरी गाठण्यास अपयश आले. चारही कॅटेगरीमध्ये मिळून तिचा स्कोर 42.565 इतकाच होता. तिला 29 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान टॉप 24 खेळाडू ऑल राउंड फायनलसाठी पात्र ठरतात.  

12:25 July 25

भारतीय नेमबाज सलग चौथ्या इव्हेंटमध्ये फेल

भारतीय नेमबाज सलग चौथ्या इव्हेंटमध्ये अपयशी ठरले आहे. दीपक कुमार आणि दिव्यांस सिंह पवार टॉप-20 मध्ये देखील स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.  

12:25 July 25

नेताराला 33व्या स्थानावर समाधान

सेलर - नेतारा टोकियोमध्ये आपल्या पहिल्या रेस लेजर रेडियल इव्हेंटमध्ये 33 व्या स्थानावर राहिली.  

11:47 July 25

भारताच्या जी. साथियानचा पराभव

टेबल टेनिस: पुरुष एकेरी दुसरी फेरीत भारताच्या जी. साथियानचा पराभव झाला. साथियानचा हाँगकाँगच्या सियू हांग लॅमने 4-3 असा पराभव केला. 

10:53 July 25

भारतीय नेमबाजांची सुमार कामगीरी

पुरूष 10 मीटर एअर पिस्टल पात्रता फेरीत भारतीय नेमबाजांनी सुमार कामगिरी केली. भारताचे दीपक कुमार आणि दिव्यांश सिंह पवार यांनी निराश केले. दीपक 28व्या तर दिव्यांश 33व्या स्थानावर आहे.  

10:11 July 25

सानिया-अंकिता जोडीचा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव

भारताची टेनिस स्टार जोडी सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांना पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. महिला दुहेरीत यूक्रेनच्या लिंडमायला-नादिया जोडीने भारतीय जोडीचा 0-6, 7-6, 10-8 अशा फरकाने पराभव केला.  

09:31 July 25

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक: प्रणती नायक १२व्या स्थानावर

भारताची प्रणती नायक पात्रता फेरीत ४२.५६५ गुणांसह १२व्या स्थानावर राहिली. 

09:28 July 25

स्कीट- अंगद बाजवा आणि मेराज खानची दमदार सुरुवात

पुरुष स्कीटच्या पात्रता फेरीत भारताच्या मेराज खान आणि अंगद बाजवा यांनी चांगली सुरुवात केली. मेराजने पहिल्या फेरीत 25 गुण मिळवून पहिले स्थान पटकावले.तर अंगद पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, या स्पर्धेतील पहिले सहा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

09:21 July 25

रोइंग- अरविंद सिंग आणि अरुण लाल उपांत्य फेरीत

अरविंद सिंग आणि अरुण लाल यांनी लाइटवेट मेन्स डबल्स स्कलच्या रेपेचेज राउंडमध्ये 6:51:36 वेळेसह तिसरे स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली. 

09:15 July 25

नेमबाज - मनु भाकर आणि यशस्विनी देसवालकडून निराशा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिसर्‍या दिवशी खराब सुरुवात झाली आहे. भारताच्या स्टार नेमबाज मानू भाकर आणि यशस्विनी देसवाल या 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्या.  

09:12 July 25

बॅडमिंटन - पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. तिने पहिला सामना अवघ्या 28 मिनिटात जिंकला. महिला एकेरीत सिंधूने इस्राईलच्या सेनियाचा 21-7, 21-10 असा एकतर्फा पराभव केला. आता तिचा पुढील सामना मंगळवारी ग्रुप फेरीत होणार आहे.  

08:54 July 25

भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 7-1 ने धुव्वा, पुढील सामना स्पेनशी

टोकियो ऑलिम्पिक 2020 चा आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी भारतीय नेमबाजांना पदक जिंकण्याची संधी आहे. यासोबत हॉकी, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग, रोविंग या क्रीडा प्रकारातील देखील सामने आज होणार आहेत. भारताने शनिवारी पदकाचे खाते उघडले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो गटात भारताला रौप्यपदक जिंकून दिलं आहे.  

Last Updated : Jul 26, 2021, 10:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details