टोकियो - भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. तिने 49 किलोग्राम गटात आज शनिवारी रौप्य पदकाची कमाई केली. भारतीय वेटलिफ्टिंग इतिहासात हे दुसरे पदक आहे. याआधी भारताने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्र्वरीने भारताला पदक जिंकून दिले होते.
वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलोग्राम गटात भारताचे प्रतिनिधित्व करत होती. ती तिसऱ्या प्रयत्नात 89 किलोग्रामचे वजन उचलू शकली नाही. त्यामुळे स्नॅचमध्ये तिचे वजन 87 किलोग्रामचे मानण्यात आले होते. ती त्यावेळी दुसऱ्या स्थानावर होती. मीराबाईच्या पुढे पहिल्या स्थानावर चीनची जजिहु होती. तिने 94 किलोग्राम वजनासोबत ऑलिम्पिक रेकॉर्ड बनवला.
मीराबाई चानूने त्यानंतर क्लीन अॅन्ड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 110 किलोचे वजन उचलत भारताचे ऑलिम्पिकमधील पहिले पदक निश्चित केले. परंतु ती सुवर्णपदकाला गवसणी घालण्यात अपयशी ठरली. मीराबाईने एकूण 202 वजन उचलत रौप्यपदक जिंकले.
मल्लेश्र्वरीनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई दुसरी -