टोकियो -भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिकला पहिल्या फेरीत पराभव पत्कारावा लागला. 57 किलो वजनी गटात बेलारुसच्या एरिना कुराचकिना हिने अंशू मलिकचा 8-2 ने पराभव केला. परंतु अंशू मलिक कांस्य पदकाच्या शर्यतीत आहे.
बेलारुसची कुस्तीपटू एरिना कुराचिकिनाने उपांत्य फेरी गाठली. तिने जर अंतिम फेरी गाठली तर अंशू मलिकला रेपेचाजच्या माध्यमातून कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळेल.
हा रेपेचाज आहे तरी काय हे समजून घ्या
जुडो, तायक्वोंदो आणि कुस्तीमध्ये दोन-दोन कांस्य पदक दिले जातात. पण कुस्तीमध्ये कांस्य पदकाच्या विजेत्यांचा निर्णय उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन खेळाडू आणि दोन फायनलिस्ट खेळाडूंनी आधीच्या राउंडमध्ये पराभूत केलेल्या खेळाडूंच्या रेपेचाज सामन्याच्या आधारे होतो.
कुस्तीमधील रेपेचाजला समजणे थोडेसे कठीण आहे. कुस्तीमध्ये रेपेचाज 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सामिल करण्यात आला आहे. या नियमाच्या आधारावर भारताच्या अनेक कुस्तीपटूंनी पदकं जिंकली आहेत. यात सुशील कुमार याने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर योगेश्वर दत्त याने रिओ ऑलिम्पिक तर साक्षी मलिक याने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
रवी दाहिया-दीपक पुनिया उपांत्य फेरीत
भारतीय पुरुष कुस्तीपटू रवी कुमार दाहिया आणि दीपक पुनिया उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. रवी कुमार दाहिया 57 किलो वजनी गटात तर दीपक पुनिया 86 किलो वजनी गटातून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यामुळे भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत.
हेही वाचा -Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमार दाहिया उपांत्य फेरीत
हेही वाचा -Tokyo Olympics : कुस्तीपटू दीपक पुनिया उपांत्य फेरीत