टोकियो -भारतीय पुरूष बॉक्सर सतीश कुमार, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या शर्यतीत आहे. सतीश आज 91 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. सतीशने जर हा सामना जिंकला तर तो उपांत्य फेरीत पोहोचेल आणि भारताचे आणखी एक पदक निश्चित होईल.
सतीश कुमारला पडले 7 टाके
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी सतीश कुमार 7 टाके पडले आहेत. जमैकाच्या रिकार्डो ब्राउन याच्याविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सतीशला दुखापती झाली. ब्राउनच्या पंचने सतीशची हनुवटी आणि डाव्या डोळ्यावरिल भाग फाटला होता. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितलं की, 'मी शनिवारी सतीशला भेटलो आहे. डॉक्टरांनी त्याला रिंगमध्ये उतरण्याची परवानगी दिली आहे.'
सतीशचा आजचा सामना उज्बेकिस्तानच्या बखोदिर जालोलोव याच्याशी होणार आहे. उज्बेकिस्तानचा हा खेळाडू सद्याचा विश्वविजेता आणि आशियाई चॅम्पियन आहे. जालोलोव याने अजरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेव याचा 5-0 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सतीश जर बखोदिरवर भारी पडला तर त्याचे एक पदक निश्चित होईल.