टोकियो - भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने बुधवारी भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील आणखी पदक निश्चित केलं आहे. त्याने कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नूरीस्लामचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात रवी कुमार दहियाचा सामना 2 वेळचा जगज्जेता रशियाचा झवुर युगुऐव याच्याशी होणार आहे. जर रवी कुमार दहियाने युयुऐवचा अंतिम सामन्यात पराभव केला तर तो कुस्तीमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला कुस्तीपटू ठरेल.
रवी दहिया आणि झवुर युगुऐव दोघेही फॉर्मात -
रवी दहिया आणि झवुर युगुऐव हे दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत. दोघे याआधी 2019 विश्व चॅम्पियनशीपमध्ये समोरासमोर आले होते. तेव्हा रशियाच्या कुस्तीपटूने हा सामना 6-4 असा जिंकला होता. विश्व चॅम्पियनशीपमध्ये रवी कुमारला कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते. रवीने 2020 आणि 2021 आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. याशिवाय त्याने 2018 मध्ये अंडर 23 चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.
रवी दहिया- झवुर युगुऐव आज आमने-सामने