मुंबई - टोकियो ऑलिम्पिक नुकतेच पार पडलं आहे. टोकियोत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. आता पुढील ऑलिम्पिक 2024 ला पॅरिस येथे होणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला अॅथलिट शूटर अभिनव बिंद्राने पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिंद्राच्या मते, पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला 3 वर्षाचा कालावधी राहिला असून खेळाडूंसाठी हे ऑलिम्पिक आव्हानात्मक ठरणार आहे.
अभिनव बिंद्रा ईएलएएमएस स्पोटर्स फाउंडेशनच्या वेबिनारमध्ये बोलताना म्हणाला, टोकियोत ऐतिहासिक प्रदर्शन राहिले आणि सात पदक भारतीय खेळाडूंची जिंकली. येथे काही क्षण चांगले तर काही भावूक करणारे पाहायला मिळाले. यालाच खेळ म्हणतात.
मी पुढील ऑलिम्पिक चक्राला थोडसे आव्हानात्मक मानतो. कारण यासाठी कमी कालावधी राहिला आहे. कारण खासकरून अॅथलिट ऑलिम्पिकनंतर एक वर्षापर्यत थोडसं रिलॅक्स राहतात. ज्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि ते रिकवर होतात. पण यावेळी त्यांना तात्काळ वापसी करावी लागेल, असे देखील बिंद्रा म्हणाला. दरम्यान, बिंद्रा 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नेमबाज आहे.