नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग (WPL) ला टाटा समूहाच्या रूपाने टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. आता याला टाटा डब्ल्यूपीएल असे या संघाला म्हटले जाणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूह टाटाने WPL चे टायटल राइट्स विकत घेतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 28 जानेवारी 2023 रोजी 2023 ते 2027 या पाच वर्षांसाठी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या शीर्षक प्रायोजकत्व अधिकारांसाठी बोलीकरिता आमंत्रित केले होते. आता टाटा समूहाला तो अधिकार मिळणार आहे.
या मीडिया हाऊसने घेतले हक्क विकत :जोपर्यंत मीडिया अधिकारांचा संबंध आहे, Viacom18 Media Pvt Ltd ने 2023-2027 या कालावधीसाठी WPL च्या मीडिया अधिकारांसाठी (म्हणजेच जागतिक दूरदर्शन अधिकार आणि जागतिक डिजिटल अधिकार) 16 जानेवारी रोजी एकत्रित बोली जिंकली. Viacom18 ने 951 कोटी रुपयांची बोली लावून हक्क विकत घेतले होते, म्हणजे प्रति सामना 7.09 कोटी रुपये असा आहे.
बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले :यापूर्वी, पहिल्या डब्ल्यूपीएलच्या पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले होते. अदानी स्पोर्ट्सलाइनने अहमदाबादचा संघ १२८९ कोटी रुपयांना विकत घेतला, जो सर्वात महागडा संघ आहे. याशिवाय आयपीएल संघ मालक मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी 912.99 कोटी, 901 कोटी आणि 810 कोटी रुपयांसाठी यशस्वी बोली लावली होती. लखनौचा संघ कॅप्री ग्लोबल होल्डिंग्सने 757 कोटी रुपयांना विकत घेतला.