महाराष्ट्र

maharashtra

बॉक्सर शिवाची सुवर्ण कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

By

Published : Jul 20, 2019, 8:52 PM IST

शिवा थापाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत कझाकिस्तानचा खेळाडू जाकीर सैफूलीनचा पराभव केला. सैफूलीनला उपांत्य सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे अंतिम फेरीत वाकओवर मिळाला आणि थापाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. थापाने ६३ किलो वजनी गटात  हे सुवर्णपदक जिंकले.

बॉक्सर शिवाची सुवर्ण कामगिरी, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

नवी दिल्ली - भारताचा बॉक्सर खेळाडू शिवा थापाने कझाकिस्तानच्या नूर सुलतानचा पराभव करत प्रेसिडेंट कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २००६ साली सुरूवात झालेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा थापा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारताने या स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्य पदकांचा समावेश आहे.

शिवा थापाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत कझाकिस्तानचा खेळाडू जाकीर सैफूलीनचा पराभव केला. सैफूलीनला उपांत्य सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे अंतिम फेरीत वाकओवर मिळाला आणि थापाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. थापाने ६३ किलो वजनी गटात हे सुवर्णपदक जिंकले.

महिलांमध्ये ६० किलो वजनी गटात परवीन हिने रौप्य पदक जिंकले. इंडिया ओपन स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या १९ वर्षीय परवीनला अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या रिमा वोलोसेंकी हिच्याकडून 0-5 ने पराभूत व्हावे लागले.

६९ वजनी पुरुष गटात दुर्योधन सिंह नेगी याला कझाकिस्तानचा शाइकन तलगतकडू 1-4 ने पराभव स्वीकारावा लागला. तर ८१ किलो वजनी गटात स्वीटी बोरा रुसच्या एलिना गापेशिनाने पराभूत केले. त्यामुळे स्वीटीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details