मुंबई -टोकियो पॅरालिम्पिकमधील पदकवीर शुटर मनिष नारवाल, उंच उडीपटू शरद कुमार, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुंदर सिंग गुर्जर यांची नावे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 साठी पाठवण्यात आली आहेत. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियांने या नावांची शिफारस केली आहे. या चौघांनी पॅराऑलिम्पिकच्या माध्यमातून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी सांगितलं की, पुरस्कार जिंकल्यानंतर अॅथलिटचे 2024 पॅरिस पॅरालिम्पिक खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
दीपा मलिक एएनआयशी बोलताना म्हणाल्या, आपल्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांचा आपल्याला अभिमान आहे. हा पुरस्कार त्यांना पुढील पॅरालिम्पिक स्पर्धेत अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देईल. ते या पदासाठी पात्र आहेत कारण त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे.