महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Goalkeeper Savita statement : आम्ही आमच्या चुकांवर काम केले असून बेल्जियमचा सामना करण्यास सज्ज आहोत - सविता - sports News

एफआयएच महिला हॉकी प्रो लीगमध्ये ( FIH Women Hockey Pro League ) तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय संघ या आठवड्याच्या अखेरीस अँटवर्पमधील स्पोर्ट्ससेंट्रम विल्रिजक्स प्लेन स्टेडियमवर जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमशी भिडणार आहे.

Savita
Savita

By

Published : Jun 9, 2022, 3:35 PM IST

ब्रुसेल्स: भारतीय हॉकी संघाचे सध्या आठ सामन्यांतून 22 गुण आहेत आणि 11 आणि 12 जून रोजी दोन सामन्यांमध्ये बेल्जियमशी सामना होईल. एफआयएच प्रो लीगमधील हे दोन सामने आणि त्यानंतरचे सामने स्पेन आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. तत्पुर्वी भारतीय हॉकी संघाची कर्णधार आणि गोलकीपर सविताने प्रतिक्रिया ( Goalkeeper Savita statement ) दिली आहे.

भारताने अलीकडेच चांगली कामगिरी केली असून जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. प्रो लीग 2021/22 ( FIH Women Hockey Pro League 2021-22 ) मध्ये अर्जेंटिना आणि नेदरलँड नंतर ते सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, बेल्जियम सध्या 8 सामन्यांतून 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गोलकीपर सविता आगामी सामन्यांसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करत आहे. डबल हेडरपूर्वी संघाने प्रतिपक्षासाठी कशी तयारी केली आहे, हे तिने स्पष्ट केले.

हॉकी इंडियाने प्रसिद्धीपत्रकात सविता म्हणाली की, आम्ही बेल्जियममध्ये खेळण्यास तयार आहोत. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत ज्यांना परदेशी भूमीवर जिंकण्यासाठी काय करावे लागते हे माहीत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जिंकण्यासाठी जे काही लागते ते आमच्याकडे आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या आमच्या गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही केलेल्या चुकांवर आम्ही काम केले आहे आणि आम्हाला खात्री आहे की, आगामी सामन्यांमध्ये आम्ही त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. आम्हाला ज्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे त्याबद्दल बोललो आहोत आणि त्या क्षेत्रांमध्ये कठोर परिश्रम केले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही येथे यशस्वी होऊ.

भारतीय महिला हॉकी संघ एप्रिलमध्ये त्यांच्या शेवटच्या FIH महिला हॉकी प्रो लीग 2021/22 सामन्यांमध्ये नेदरलँड्सविरुद्ध विजय आणि पराभवानंतर स्पर्धेत प्रवेश करेल. बचावपटू दीप ग्रेस एक्काला ( Defender Deep Grace Ekka ) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात संघात सुधारणा होत असून बेल्जियमविरुद्ध विजय मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा -Joe Root Bat Video : सोशल मीडियावर जो रुटचा 'हा' व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details