महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Australian Open 2023 : सानिया आणि बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत; मुलगा इझान मलिकसह सानिया मिर्झा

भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि सहावेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सानिया हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णासह प्रवेश केला आहे. सानिया अंतिम फेरीत पोहचताच मुलगा इझान मलिकने पळत येऊन आईला मिठी मारत आनंत व्यक्त केला. हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

Australian Open 2023
सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या अंतिम फेरीत; मुलगा इझान मलिकसह सानिया मिर्झा

By

Published : Jan 26, 2023, 7:19 PM IST

नवी दिल्ली : सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी उपांत्य फेरीत डेसिरिया क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की या तिसऱ्या मानांकित अमेरिकन-ब्रिटिश जोडीचा पराभव करून मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सानिया आणि बोपण्णा यांनी दोन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन जोडी देसिरा-स्कुप्स्कीचा 7-6(5), 6-7(5), 10-6 असा संघर्षपूर्ण सामना केला.

सामना जिंकताच सानियाचा मुलगा इझान मलिक हा आनंदी :सानिया आणि बोपण्णा या जोडीने सामना जिंकताच सानियाचा मुलगा इझान मलिक हा आनंदी झाला. त्याने आईकडे धाव घेतली आणि तिला मिठी मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ग्रँड स्लॅम फायनलमध्ये भारतीय प्रतिनिधित्व करण्याची ही पाच वर्षांतील पहिलीच वेळ असेल. बोपण्णाने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत हंगेरीच्या टाइमा बाबोससह प्रवेश केला. परंतु, त्याला पराभव पत्करावा लागला.

सहा वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सानियाची शेवटची मोठी स्पर्धा :सहा वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सानिया तिची शेवटची मोठी स्पर्धा खेळत आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला तिने 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. टुर्नामेंट आयोजकांनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये सानिया-बोपण्णा आपल्या मुलांसोबत विजय साजरा करीत आहेत.

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने दिल्या सानियाला शुभेच्छा :सानियाने तिचा मुलगा इझानला मिठी मारली आहे, तर बोपण्णाने तिची मुलगी त्रिधाला आपल्या मिठीत घेतले आहे. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल सानिया मिर्झाचे अभिनंदन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details