महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2019, 4:14 PM IST

Updated : Nov 9, 2019, 4:30 PM IST

ETV Bharat / sports

भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालिम्पिकसाठी ठरले पात्र

संदीप आणि सुमित यांनी भालाफेकमध्ये एफ-६४ या प्रकारात पहिले दोन स्थान राखत ही कामगिरी केली. संदीपने एफ-६४ या प्रकारात सुधारणा करत ६५.८० मीटर तर, सुमितने ६२.८८ मीटर लांब भाला फेकला.

भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालम्पिकसाठी ठरले पात्र

दुबई -भारताचे भालाफेक खेळाडू संदीप चौधरी आणि सुमित अंतिल यांनी सध्या सुरू असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिकचे तिकिट मिळवले.

हेही वाचा -यष्टीरक्षण तसेच फलंदाजीत 'फेल' ठरलेल्या पंत विषयी गांगुलीचे मोठे विधान

संदीप आणि सुमित यांनी भालाफेकमध्ये एफ-६४ या प्रकारात पहिले दोन स्थान राखत ही कामगिरी केली. संदीपने एफ-६४ या प्रकारात सुधारणा करत ६५.८० मीटर तर, सुमितने ६२.८८ मीटर लांब भाला फेकला. पॅरिसमध्ये यंदाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या एफ-६४ या प्रकारात सुमित अंतिलने ६१.३२ मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम केला होता.

Last Updated : Nov 9, 2019, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details