केपटाऊन : दक्षिण आफ्रिका आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. यामध्ये जगातील दहा बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघ दोन गटांत विभागले गेले आहेत. यजमान दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया 'अ' गटात आहे. तर 'ब' गटात भारत, पाकिस्तान, इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश असणार आहे. यामध्ये भारताबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडिया विश्वचषक २०२० ची उपविजेता आहे.
आज दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांची लढत :दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका आज एकमेकांना भिडणार आहेत. ICC महिला T20 विश्वचषक (महिला T20 विश्वचषक 2023) दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) यांच्यातील पहिला सामना रात्री 10:30 वाजता सुरू होईल. गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर दक्षिण अफ्रिका संघाचे पारडे श्रीलंकेवर जड आहे. दक्षिण अफ्रिकेने गेल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. १७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळतील.
या स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया हा नंबर 1 संघ : जगात 50 पेक्षा जास्त देशांतील महिला क्रिकेट संघ आहेत, परंतु 2023 च्या T20 विश्वचषकासाठी फक्त 10 देश पात्र ठरले आहेत. विश्वचषक स्पर्धेत भाग घेणारे संघ आयसीसीच्या टॉप टेन क्रमवारीत आहेत. जगातील नंबर 1 संघ ऑस्ट्रेलिया आहे, ज्याची कमान मॅग लॅनिंगच्या हातात असेल. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषकात सहभागी होत आहे.