सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या वांग झी यी हिच्यावर मात करत शानदार विजय ( PV Sindhu defeated Wang Zi Yi ) मिळवला. सिंधूने वांग झी यीचा 21-9, 11-21 आणि 21-15 असा पराभव केला. त्यामुळे तिने तिचे पहिले सिंगापूर ओपन जेतेपद पटकावले. सिंधूने 11व्या क्रमांकाच्या वांग झी यीचा पराभव करून तिचे पहिले सुपर 500 विजेतेपद ( Sindhu clinches Singapore Open title ) जिंकले.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचे यंदाचे हे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी या जेतेपदामुळे सिंधूचा आत्मविश्वास नक्कीच उंचावणार आहे.
सिंधूने सामन्याची शानदार सुरुवात केली, पहिल्या सेटमध्ये तिने चीनच्या शटलरचा 21-9 अशा मोठ्या फरकाने पराभव केला, पण दुसऱ्या सेटमध्ये वांग झी यीने शानदार पुनरागमन करत सिंधूचा 11-21 असा पराभव केला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली, मात्र सामन्याच्या अखेरीस सिंधूने वांग झी यीवर वर्चस्व ( Sindhu dominates Wang Zi Yi ) राखण्यास सुरुवात केली आणि अंतिम सेट 21-15 असा जिंकून विजेतेपद पटकावले.
सिंधू अंतिम सेटमध्ये 11-6 अशी आघाडीवर होती, परंतु चीनच्या शटलरने जोरदार पुनरागमन करत स्कोअर 12-11 ने नेला. यादरम्यान सिंधूने कोर्टच्या मूल्यांकनात अनेक चुका केल्या, पण शेवटी या खेळाडूने दमदार पुनरागमन करत सामना जिंकला. तसेच सिंगापूर ओपन 2022 चे विजेतेपद ( Singapore Open 2022 title ) जिंकण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.
हेही वाचा -Lalit Modi Net Worth : करोडोंचा मालक असलेले फरार ललित मोदी इतके श्रीमंत कसे झाले? घ्या जाणून