हैदराबाद- प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात यू मुंबाने विजयी सुरुवात केली. आजच्या सामन्यात यू मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सला 8 गुणांनी हरवले. सामन्यात यू मुंबाच्या संघाने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला.
प्रो कबड्डी : यू मुंबाची विजयी सलामी; टायटन्सला 8 गुणांनी चारली धूळ - फझल अत्रचली
पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.
यू मुंबाने पहिल्या हाफमध्ये 17-10 अशी लीड घेतली होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तेलुगू टायटन्सनी चांगला खेळ करत सामन्यात वापसी केली. मात्र, ते यू मुंबाला हरवण्यात अपयशी ठरले. सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा 31-25 ने पराभव केला. या सामन्यात अभिषेकने 10 रेड पाँईन्ट मिळवले.