रेकजाविक (आईसलँड):युवा भारतीय ग्रँडमास्टर (जीएम) रमेशबाबू प्रज्ञानानंदने ( Indian Grandmaster Rameshbabu Pragyanand ) अंतिम फेरीत देशबांधव डी गुकेशवर विजय मिळवून रेकजाविक ओपन बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. प्रज्ञानानंदने नऊ फेऱ्यांतून 7.5 गुणांसह चार खेळाडूंपेक्षा अर्ध्या गुणाने आघाडीवर राहिला. नेदरलँडचा मॅक्स वार्मर्डम, डेन्मार्कचा मॅड्स अँडरसन, स्वीडनचा हजोर स्टीन ग्रेटरसन आणि अमेरिकेचा अभिमन्यू मिश्रा यांनी 7.0 गुणांसह स्पर्धेचा शेवट केला.
काही महिन्यांपूर्वी प्रज्ञानानंदने ( Rameshbabu Pragyanand ) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि सध्याचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा वेगवान सामन्यात पराभव करून खळबळ उडवून दिली होती. मंगळवारी, 16 वर्षीय बुद्धिबळपटूने 245 खेळाडूंसह मैदानात अव्वल स्थान पटकावले, त्यापैकी बहुतेक तरुण खेळाडू होते. कारण आयोजकांनी 16 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना प्रवेश शुल्कावर 50 टक्के सूट दिली होती.