नवी दिल्ली- भारताची वेगवान धावपटू हिमा दास हिने चारच दिवसात दोन सुवर्ण पदके जिंकत इतिहास घडवला. हिमा दास हिने 5 जुलैला पोलंडमध्ये 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर रविवारी पोलंडमध्येच कु्ट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात दुसरे सुवर्ण पदक जिंकले.
हिमा दास 'सुसाट', चार दिवसात जिंकली दोन सुर्वणपदके - gold
भारताची वेगवान धावपटू हिमा दास हिने चारच दिवसात दोन सुवर्ण पदके जिंकत इतिहास घडवला. हिमा दास हिने ५ जुलैला पोलंडमध्ये 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर रविवारी पोलंडमध्येच कु्ट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात दुसरे सुवर्ण पदक जिंकले.
हिमा दास 'सुसाट', चार दिवसात जिंकले दोन सुर्वणपदक
आसामची खेळाडू हिमा दास हिने 23.97 सेंकदामध्ये अंतर पार करत स्पर्धा जिंकली तर केरळची धावपटू विके विस्मयाने हिने 24.06 सेंकदामध्ये अंतर पार करत रजत पदक जिंकले. पुरूषामध्ये मोहम्मद अनसनेही 21.18 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
हिमा दास मागील काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. या दुखण्यातून सावरताच मैदानावर आठवड्याभरातच दोन सुवर्णपदकांचा वेध घेतला आहे.