महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Anushka and Virat Trekking : अनुष्का आणि विराटची लाडक्या लेकीसोबत ट्रॅकींग, निसर्गाचा घेतला आनंद; सुंदर फोटो केले शेअर - निसर्गाचा घेतला आनंद

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर ऋषिकेशचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती विराट आणि वामिकासोबत ट्रॅकींग करताना दिसत आहे. यावेळी या जोडीने आपल्या लाडक्या लेकीला घेऊन पर्वत चढताना दिसत आहे. फार सुंदर फोटो अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पाहुयात यावरील सविस्तर रिपोर्ट

Anushka and Virat Trekking in Uttarakhand
अनुष्का आणि विराटची लाडक्या लेकीसोबत ट्रॅकींग, निसर्गाचा घेतला आनंद; सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर

By

Published : Feb 1, 2023, 4:51 PM IST

देहरादून : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली आपल्या मुलीसोबत ऋषिकेशमध्ये सुटी घालवण्यात व्यस्त आहेत. नुकतेच कपल्सचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ब्रह्मलिन दयानंद सरस्वती आश्रमाला भेट दिली होती. यानंतर जोडप्यांनी धार्मिक विधी पार पाडले आणि अन्नदान करून संतांचे आशीर्वाद घेतले. धार्मिक तीर्थयात्रा केल्यानंतर अनुष्का-विराट आपल्या मुलीसोबत ट्रेकिंगला गेले. अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या छान व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

अनुष्काने विराटसोबतचे ट्रॅकींग फोटो केले शेअर :अनुष्का शर्माने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ट्रेकिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'येथे फक्त पर्वत आहेत आणि वर कोणीही नाही.' शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वामिका विराटच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. त्याचवेळी अनुष्का विराटचा हात धरून पुढे जाताना दिसत आहे. ट्रॅकिंगचा मनमुराद आनंद घेताना, हे कुटुंब छान दिसत आहे. दोघेही सुटीवर असताना निसर्गाच्या सानिध्याचा कायम आनंद घेत असतात.

विराट-अनुष्का मुलीसोबत ट्रॅकींग करताना
विराट-अनुष्का मुलीसोबत ट्रॅकींग करताना

विराट वामिकाला नदीच्या पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न :दुसऱ्या एका छायाचित्रात विराट आणि वामिका एकत्र दिसत आहेत. या छायाचित्रात विराट वामिकाला नदीच्या पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेअर केलेल्या या पोस्टला काही तासांत 17 लाख लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या पोस्टवर ५ हजारांहून अधिक लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. अनुष्काच्या या पोस्टवर विराट कोहलीने प्रेमाचा वर्षाव केला आहे. या पोस्टपूर्वी आणखी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये ती ध्यान करताना दिसत आहे.

आपल्या लाडक्या लेकीला पाण्याचा स्पर्श करतानाचा हृदयस्पर्शी फोटो
विराट-अनुष्का मुलीसोबत ट्रॅकींग करताना

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा आश्रमातील फोटो व्हायरल :अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा आश्रमातील फोटो व्हायरल झाला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा ऋषिकेश येथील स्वामी दयानंद गिरी यांच्या आश्रमातील एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, या जोडप्याने आश्रमात धार्मिक विधींमध्ये भाग घेतला आणि तेथे भंडाराही आयोजित केला.

विराट-अनुष्का मुलीसोबत ट्रॅकींग करताना
विराट-अनुष्का मुलीसोबत ट्रॅकींग करताना

अनुष्का विराट नेहमी घेतात निसर्गाचा आनंद :विराट नेहमी आपल्या सुटीचा आनंद कुटुंबासोबत घालवत ते क्षण साजरे करीत असतो. जेव्हा जेव्हा विराट सुटीवर येतो. तेव्हा अधिकाधिक निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करीत असतो.आपल्या लेकीला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाण्याचा या जोडीचा प्रयत्न आनोखा आहे. त्यामुळे चाहते त्यांच्या फोटोंना खूप लाईक करतात. मागच्या वेळी सुटीवर असताना, त्यांनी वृदांवनच्या आश्रमाला भेट देत साधु-संतांचे आशीर्वाद घेतले. निसर्गाचा मनमुराद आनंद दोघे घेताना त्यावेळीसुद्धा दिसून आले.

निसर्गाच्या सानिध्यात अनुष्का ध्यान करताना

ABOUT THE AUTHOR

...view details