पनामा सिटी - दिग्गज बॉक्सर रॉबर्ट दुरान यांना गुरुवारी कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुरान यांचा मुलगा रॉबिन यांनी याबाबत माहिती दिली. "माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्दीशिवाय त्यांना इतर कोणतीही लक्षणे नाहीत. ते फक्त देखरेखीखाली आहेत", असे रॉबिन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले.
दिग्गज बॉक्सर रॉबर्ट दुरान रुग्णालयात दाखल
16 ते 50 वयोगटात दुरान यांनी एकूण 119 सामने खेळले. त्यात त्यांनी 103 सामन्यात विजय नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.. त्यांच्याशिवाय ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक, व्हिक्टर ट्रॉकी यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले होते.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी, पाकिस्तानच्या संघातील 10 खेळाडूंनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगभरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी देखील जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जगभरामध्ये आतापर्यंत तब्बल 4 लाख 90 हजार 933 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.