नवी दिल्ली : आशिया कप 2023 बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सध्या याचे यजमानपद पाकिस्तानकडेच आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. यामुळे आशिया चषक इतरत्र होऊ शकतो. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानमधील क्रिकेट नियामक मंडळ आशिया चषक त्यांच्या देशात आयोजित करण्याचा निर्धार करीत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.
शाहिद अफ्रिदीचे पीएम मोदींना आवाहन : स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने पीएम मोदींना आवाहन केले आणि भारतीय संघाने पाकिस्तानला भेट द्यावी आणि दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामना खेळवला जावा, असे आवाहन केले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. पाकिस्तानमधील सुरक्षेबाबत आफ्रिदी म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अलीकडेच अनेक संघ आपल्या देशात आले आहेत. आफ्रिदी म्हणतो की, 'आम्हालाही भारतातील सुरक्षेचा धोका होता, त्यानंतर दोन्ही देशांच्या सरकारने परवानगी दिली तर नक्कीच भेट देऊ'. आपल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींना दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्यावे अशी विनंती केली.
पीसीबी आणि बीसीसीआयवर व्यक्त केले मत :शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आले की पीसीबी कमकुवत आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, 'पीसीबी कमकुवत नाही, पण समोरून काही प्रतिक्रिया यायला हव्यात. मला तुमच्याशी मैत्री करायची असेल आणि तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची नसेल तर मी काय करू? आफ्रिदीने पीसीबीला कमकुवतही म्हटले नाही आणि बीसीसीआयला मजबूत बोर्ड म्हटले आहे. त्याने पुढे बोलताना सांगितले की, मजबूत व्यक्तीवर अधिक जबाबदारी असते.