लंडन -'लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2022' या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी एकून सहा खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. ज्यामध्ये भारताच्या एका खेळाडूचा समावेश आहे. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (Olympic gold medalist Neeraj Chopra) लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार 2022 साठी नामांकन मिळाले आहे. नामांकन मिळाल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिक्रिया (Athlete Neeraj Chopra's reaction) दिली आहे.
नीरज चोप्रा म्हणाला, " लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने मी आनंदी आहे. टोकियोमध्ये मी जे काही साध्य केले त्याबद्दल क्रीडा जगतात ओळखले जाणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे."
तो पुढे म्हणाला, भारतातील एका छोट्या गावातील एक मुलगा, ज्याने फक्त फिटनेससाठी खेळायला सुरुवात केली, ऑलिम्पिक व्यासपीठावर उभे राहणे हा एक लांबचा प्रवास आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जागतिक स्तरावर भारतासाठी पदके जिंकणे आणि आता लॉरियससाठी नामांकन मिळणे ही खरोखरच विशेष भावना आहे."