नवी दिल्ली - भारताची महिला धावपटू निर्मला शेरॉन डोपिंगमध्ये दोषी आढळली आहे. यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय अॅथलेटिक्स इंटिग्रिट युनीट (एआईयू) ने घेतला आहे. दरम्यान, शेरॉनने जिंकलेली पदके भारताला परत करावी लागणार आहेत.
हरियाणाची धावपटू निर्मला शेरॉनला एआईयूने जून २०१८ साली भारतामध्ये झालेल्या स्पर्धेत दोषी ठरवले आहे. या स्पर्धेत स्टेरॉयड ड्रोस्तानोलोन आणि मेटेनोलोनचा या औषधाचा वापर शेरॉनने केला असल्याचा ठपका त्याच्यावर आहे. त्यामुळे शेरॉनवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शेरॉनवर ऑक्टोबरपासून बंदी लागू करण्यात आली आहे.
एआयीसूच्या म्हणण्यानुसार, शेरॉनच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये गडबड जाणवली होती. त्यामुळे त्याचा सखोल तपास करण्यात आला. शेरॉनची चाचणी केल्यानंतर ती दोषी आढळली. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, तिने या बंदीचा स्वीकार केलेला असून या प्रकरणी चौकशीची मागणी तिने केलेली नाही.