नवी दिल्ली:निखत झरीनने गुरुवारी इस्तंबूल येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ( World Boxing Championships ) थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा 5-0 असा पराभव करून फ्लायवेट (52 किलो) गटात सुवर्णपदक पटकावले ( Nikhat Zareen won the gold medal ). जिंकण्याची आपली दमदार धावपळ सुरू ठेवली. या विजयानंतर झरीनने पत्रकारांना सांगितले की, “या दोन वर्षांत मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि माझ्या खेळात ज्या काही उणिवा होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न केला.
निखत झरीन म्हणाली ( Nikhat Zareen says about Career ), मी माझ्या भक्कम बाजूंवर काम केले. मी माझ्या कमकुवत बाजूंवर काम केले. मला ज्या पैलूंवर काम करण्याची गरज होती, त्या सर्व पैलूंवर मी काम केले आणि स्वतःला बळकट केले. झरीन म्हणाली, माझ्या कारकिर्दीत मी ज्या अडथळ्यांचा सामना केला, त्यामुळे मला अधिक बळ मिळाले आहे. या सगळ्यानंतर मी मानसिकदृष्ट्या खंबीर झाले आहे. माझा विश्वास आहे की, काहीही झाले तरी मला लढायचे आहे आणि माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. या सुवर्ण कामगिरीच्या दोन वर्षांपूर्वी जरीनने तत्कालीन क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निष्पक्ष चाचणी घेण्याचे आवाहन केले होते. यामुळे झरीनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, तर एमसी मेरी कोमने विचारले होतेकी, कोण निखत झरी? त्यानंतर झरीन पात्रता चाचण्यांमध्ये मेरी कोमकडून पराभूत झाली, ज्यामुळे ती टोकियो गेम्समध्ये प्रवेश करू शकली नाही.
याआधी, 2011 ची ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन झरीनला ( Junior World Champion Nikhat Zareen ) देखील खांद्याच्या दुखापतीने ग्रासले होते, ज्यामुळे तिला एका वर्षासाठी खेळापासून दूर रहावे लागले होते. 2018 मध्ये राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी होऊ शकली नाही. झरीन म्हणाली, 2017 मध्ये मला खांद्याच्या दुखापतीमुळे त्रास झाला, त्यासाठी मला ऑपरेशन करावे लागले आणि मी एक वर्ष स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकले नाही. 2018 मध्ये मी पुनरागमन केले, पण माझ्या फॉर्मध्ये नव्हते. त्यामुळे ती कॉमनवेल्थ गेम्स, एशियाड आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या स्पर्धांना मुकली.