महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 'या' २ खेळाडूंना मिळाला 'खेलरत्न'

National Sports Awards : भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे. २०२३ वर्षासाठी क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या बॅडमिंटनपटूंना सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

National Sports Awards
National Sports Awards

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 4:58 PM IST

नवी दिल्ली National Sports Awards : यावर्षी देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठित 'खेलरत्न' पुरस्कार बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयानं बुधवारी ही घोषणा केली

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार : हे सर्व क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात दिले जातील. राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारनं खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं. मंत्रालयानं सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही जारी केली आहे.

२६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार : क्रीडा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित केलं जाईल.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार :

  1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
  2. सात्विकसाईराज रँकीरेड्डी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू :

  1. ओजस देवतळे (तिरंदाजी)
  2. अदिती स्वामी (तिरंदाजी)
  3. श्रीशंकर एम (अ‍ॅथलेटिक्स)
  4. पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स)
  5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
  6. आर वैशाली (बुद्धिबळ)
  7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
  8. अनुष अग्रवाला (घोडेस्वारी)
  9. दिव्यकृती सिंग (घोडेस्वारी)
  10. दीक्षा डागर (गोल्फ)
  11. कृष्ण पाठक (हॉकी)
  12. पुक्रंबम चानू (हॉकी)
  13. पवन कुमार (कबड्डी)
  14. रितू नेगी (कबड्डी)
  15. नसरीन (खो-खो)
  16. पिंकी (लॉन बाऊल्स)
  17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (नेमबाजी)
  18. ईशा सिंग (नेमबाजी)
  19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
  20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
  21. सुनील कुमार (कुस्ती)
  22. अंतिम (कुस्ती)
  23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
  24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
  25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
  26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार :

  1. ललित कुमार (कुस्ती)
  2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
  3. महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
  4. शिवेंद्र सिंग (हॉकी)
  5. गणेश देवरुखकर (मल्लखांब)

हे वाचलंत का :

  1. बांगलादेशच्या सौम्य सरकारनं मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्ष जुना विक्रम
  2. IPL २०२४ Auction : स्टार्क-कमिन्ससह 'या' अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना मिळाली विक्रमी किंमत, अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड
  3. मिचेल स्टार्क ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; जाणून घ्या आधीचे महागडे खेळाडू कोणते

ABOUT THE AUTHOR

...view details