महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : एकट्या कोलकात्यातून 9000 चाहते पोहचले कतारला, आणखीही जाण्याची प्रतिक्षेत - भारतातून कतारला प्रवास

सुमारे 10 ते 12 हजार फुटबॉल चाहत्यांनी आतापर्यंत भारतातून कतारला प्रवास केला आहे. यात एकट्या कोलकातामधील सुमारे 9,000 चाहत्यांचा समावेश आहे. (9000 football fans from kolkata reach qatar). कोलकात्यातून अजूनही किमान 1500 लोक कतारला जातील अशी अपेक्षा आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 11, 2022, 8:28 PM IST

कोलकाता : कोलकाता शहरात फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) ची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या जागतिक फुटबॉल स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येथील सुमारे 9000 चाहते कतारला पोहोचले आहेत. (9000 football fans from kolkata reach qatar).

अजूनही किमान 1500 लोक जातील : ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अनिल पंजाबी म्हणाले, "भारतीय चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेले ब्राझील आणि पोर्तुगालचे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही फुटबॉलचे चाहते उपांत्य आणि अंतिम फेरीपूर्वी कतारची तिकिटे, निवासाची उपलब्धता आणि प्रवास पॅकेज याबद्दल विचारपूस करत आहेत. सुमारे 10 ते 12 हजार फुटबॉल चाहत्यांनी आतापर्यंत भारतातून कतारला प्रवास केला आहे. यात एकट्या कोलकातामधील सुमारे 9,000 चाहत्यांचा समावेश आहे. एकट्या कोलकात्यातून अजूनही किमान 1500 लोक कतारला जातील अशी आमची अपेक्षा आहे".

ABOUT THE AUTHOR

...view details