नवी दिल्ली: हॉकी स्टार युवा फॉरवर्ड मोहम्मद राहिलने ( Young forward Mohammad Raheel ) हॉकी 5S चे विजेतेपद पटकावले. खेळाच्या या फॉरमॅटमध्ये सहभागी व्हायला आवडतं, असं तो म्हणाला. 25 वर्षीय राहिलने लुसानेमध्ये चमकदार कामगिरी केली. कारण तो 10 गोलांसह स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअरर म्हणून उदयास आला आणि त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
राहिल म्हणाला ( Mohammad Raheel says ), सर्वप्रथम, भारतीय संघासाठी खेळणे ही एक चांगली भावना आहे. मी संघासाठी योगदान दिल्याचा मला खरोखर आनंद आहे. हा एक चांगला अनुभव होता आणि मला खेळाचे हे स्वरूप खेळायला खूप आवडते. गुरिंदर सिंगच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने चार सामन्यांतून तीन विजय आणि एक अनिर्णित राखून राऊंड-रॉबिनचा टप्पा पूर्ण केला आणि स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.