नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी याची घोषणा केली. यात सर्व स्पर्धांसह पात्रता सामन्यांचाही समावेश आहे.
रिजिजू यांनी सांगितलं की, 'कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आज सर्व स्पर्धा रद्द करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत बंद राहतील. यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.'
आयपीएल स्पर्धेबाबत रिजिजू यांनी सांगितलं की, 'बीसीसीआय क्रिकेट संबंधी निर्णय घेते. क्रिकेट ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नाही. पण, हा फक्त एक स्पर्धेचा विषय नसून तो लोकांच्या आरोग्याचा विषय आहे. या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने लोक येतात. यामुळे हे खेळाडूशिवाय लोकांच्या सुरक्षेची बाब आहे. केंद्र शासनाकडून आयपीएल संदर्भात १५ एप्रिलनंतर योग्य निर्णय घेतला जाईल.'