महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: ६१ किलो गटात इंदापूरच्या सागरला सुवर्ण, वाचा दिवसभरातील निकाल - indapur wrestler sagar markad win gold in 61 kg

६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या सौरभ राऊतला चितपट करत अंतिम फेरी गाठली होती. तर पुणे शहराच्या निखिल कदमने सोलापूरच्या हणुमंत शिंदेवर २-१ ने मात करीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.

indapur wrestler sagar markad win gold in 61 kg
महाराष्ट्र केसरी स्पर्धा: ६१ किलो गटात इंदापूरच्या सागरने जिंकलं सुवर्ण, वाचा दिवसभरातील निकाल

By

Published : Jan 4, 2020, 11:12 PM IST

पुणे- महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला माती विभागातील सागर मारकड आणि निखील कदम या अंतिम लढतीने. या गटाच्या अंतिम फेरीत इंदापूरच्या सागर मारकडने निखिल कदमला अवघ्या ४० सेकंदात चितपट करत सुवर्णपदक पटकाविले.

६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या सौरभ राऊतला चितपट करत अंतिम फेरी गाठली होती. तर पुणे शहराच्या निखिल कदमने सोलापूरच्या हणुमंत शिंदेवर २-१ ने मात करीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.

कांस्य पदकासाठी हणुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा ) व सौरभ राऊत (औरंगाबाद शहर) यांच्यामध्ये लढत झाली. यात हनुमंत शिंदेने १२-३ ने बाजी मारली.

विशेष म्हणजे सागर मारकड प्रथमच ६१ किलो वजनी गटात खेळत होता व पदार्पणातच त्याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. या आधी सागर ५७ किलो वजनी गटात खेळत असे. त्याही गटात गेली ४ वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील क्षण....

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची प्रथम फेरी देखील आज पार पडली. यामध्ये गादी विभागाच्या विशेष लक्षवेधी लढतींमध्ये लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेवर १९ सेकंदात विजय मिळविला. तर पुण्याच्या अभिजीत कटके याने अमरावतीच्या मिरजा नदीम बेग याच्यावर ६ सेकंदात चितपट विजय मिळवून पुढच्या फेर्‍यांमध्ये सहज प्रवेश केला.

मुंबईच्या समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादुमिया मिलानीवर ७ विरुद्ध २ या गुण फरकाने विजय मिळविला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या साहिल पाटीवर ११ विरुद्ध ६ या गुण फरकाने विजय मिळविला.

विष्णु खोसे यांचा प्रतिस्पर्धी काही कारणास्तव अनुपस्थित असल्याने त्याला पुढे चाल मिळाली. तर माती विभागात गतविजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर १०-० असा तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळविला. तसेच वाशिमच्या सिकंदर शेखने तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळविला.

तर संकेत घाडगे (पिंपरी चिंचवड), सागर मोहलकर (अहमदनगर), संतोष लवाटे (कोल्हापूर जिल्हा), उमेश सिरतोडे (वर्धा), शुभम जाधव (यवतमाळ), व तृणाल वाट यांनीही प्रतिस्पर्धांचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.

६१ किलो माती विभाग – अंतिम निकाल

  • सुवर्ण – सागर मारकड (पुणे जिल्हा)
  • रौप्य – निखिल कदम (पुणे शहर)
  • कांस्य - हणुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

ABOUT THE AUTHOR

...view details