ओसाका: राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनला ( Commonwealth Champion Lakshya Sen ) बुधवारी जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला. त्याला स्थानिक खेळाडू केंटा निशिमोटोकडून तीन गेममध्ये पराभव पत्करावा ( Lakshya Sen lost to Kenta Nishimoto )लागला. 21 वर्षीय अल्मोडा येथील असून 2021 च्या जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्याला पुरुष एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानावर असलेल्या निशिमोटोकडून 21-18, 14-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना एक तास सहा मिनिटे चालला. जपानच्या खेळाडूकडून दोन सामन्यांत झालेला हा त्याचा पहिला पराभव आहे.
Japan Open Super 750 Badminton : लक्ष्य सेन जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर - Japan Open Super 750 Badminton
कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन लक्ष्य सेनला ( Lakshya Sen ) बुधवारी जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन ( Japan Open Super 750 Badminton ) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत, स्थानिक खेळाडू केंटा निशिमोटोकडून तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तो आता बाहेर पडला आहे.
तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जगातील 26व्या क्रमांकावर पोहोचलेल्या, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला या वेगवान पुरुष दुहेरीच्या जोडीला देखील पराभव पत्कारावा लागला. या जोडीला कोरियाच्या चोई सोल ग्यु आणि किम वोन यांनी 21-19, 21-23, 15-21 अशा फरकाने मात दिली. मिश्र दुहेरीत जुही देवांगन ( Juhi Devangan ) आणि वेंकट गौरव प्रसाद ( Venkat Gaurav Prasad ) या जोडीला देखील पराभवाचा सामना करावा लागला. अव्वल मानांकित झेंग सी वेई आणि चीनच्या हुआंग या कियांग यांच्याकडून अवघ्या 23 मिनिटांत 11-21, 10-21 अशी हार मानावी लागली.
हेही वाचा -Asia Cup 2022 भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्यासाठी विराट कोहली गाळतोय घाम