हरयाणा -खेलो इंडिया युवा स्पर्धेत ( Khelo India Youth Games ) महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 9 सुवर्ण पदकांची कमाई केली ( Maharashtra Shoot Into Lead With 9 Gold ) आहे. 5 सुवर्ण पदके जिंकत हरयाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य अशा 17 पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर, 5 सुवर्ण, 6 रौप्य, 12 कांस्य अशी 23 पदके हरयाणाच्या खेळाडूंनी जिंकली आहेत.
महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये 4 पैकी 3 सुवर्ण, योगात 3 आणि सायकलिंगमध्ये 1 सुवर्णपदक मिळवलं आहे. तर, हरयाणाने मॅटवरच्या कुस्तीत आपले वर्चस्व दाखवले आहे. त्यांनी कुस्तीत पाचही आणि सायकलिंमध्ये 1 सुवर्णपदक मिळवलं आहे. तसेच, पहिल्यांदा खेलो इंडियामध्ये खेळवले जात असलेल्या थांग ता या खेळामध्ये मणिपुरने चार सुवर्ण पदके जिंकत तिसऱ्या स्थान गाठले आहे. आठ पदकांची कमाई करत पंजाब चौथ्या तर चार पदकांसह चंडीगढ पाचव्या स्थानावर आहे.