नवी दिल्ली- भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्याहस्ते देण्यात आला. हा क्रीडा प्रकारामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. गेली 25 वर्षे कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याने पूनिया यांना खेल रत्न पुरस्कार देण्यात आला.
कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार 16 ऑगस्टला जाहीर करण्यात आले. त्यामध्ये पूनिया यांची निवड करण्यात आली होती. मात्र, ते कझाकिस्तानमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये व्यस्त होते. त्यामुळे 29 ऑगस्टला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पूनिया यांना खेल रत्न पुरस्कार स्वीकारता आला नव्हता.

किरण रिजिजू यांनी मोहम्मद अनास आणि तेजिंदरपाल सिंग तूर यांना अर्जून पुरस्कार प्रदान केला. तर मोहिंदर सिंग यांना प्रशिक्षणातील योगदानासाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले.