मुंबई - महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील २५ वर्षीय अविनाश साबळेने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठा पराक्रम केला. अंतिम सामन्यात अविनाशला १३वे स्थान मिळाले असले तरी त्याने पुढील वर्षी होणाऱ्या टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावले आहे.
हेही वाचा -अवघ्या ७० धावांवर ऑलआऊट झाली टीम इंडिया, तरीही हरमनप्रीतने गाठले शतक..
अविनाशने अंतिम फेरीत ८ : २१ : ३७ वेळ नोंदवत १३ वे स्थान राखले. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिक पात्रतेचे ८ मिनिटे २२ सेकंदाचे निकष पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी अविनाशने ८ मिनिटे २५.२३ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आज त्याने तोही मोडीत काढला.
बारावीनंतर अविनाश भारतीय सैन्यात दाखल होऊन ५ महार रेजिमेंटमध्ये रुजू झाला. २०१३-१४ मध्ये त्याची सियाचिन ग्लेशियरवर पोस्टिंग झाली होती. विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने सातवे स्थान राखले आहे. ४X४०० मीटर रिले स्पर्धेत भारताच्या मोहम्मद अनास, वेलुवा कारथ विस्मया, जिसना मॅथ्यू आणि नोग निर्मल टॉम या चार खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.