मुंबई - भारतीय महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्जल केले आहे. प्रिया मलिकने हंगेरीमध्ये आयोजित जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
मीराबाई चानूनंतर प्रिया मलिकने भारतासाठी पदक जिंकलं -
ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले. तिच्या या कामगिरीनंतर प्रत्येक देशवासियांना गर्व वाटत आहे. आता प्रिया मलिकने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
प्रिया मलिक हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील निवाली येथील रहिवाशी आहे. तिने निडानी येथील चौधरी भरत सिंह मेमोरियल क्रीडा शाळेत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. प्रियाचे वडिल जयभगवान निडानी हे भारतीय सेनेतून निवृत्त झालेले आहेत.