महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॉकी : भारतीय महिला संघ पराभूत, न्यूझीलंडने दिली १-० ने मात - भारतीय महिला हॉकी संघ

भारतीय संघाने आक्रमक सुरूवात केली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी मिळाला. मात्र, यावर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. यानंतर संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले.

Indian womens hockey team losses to NZ 0-1 in third match
हॉकी : भारतीय महिला संघ पराभूत, न्यूझीलंडने दिली १-० ने मात

By

Published : Jan 29, 2020, 9:23 PM IST

ऑकलंड - न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आज (बुधवार) झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १-० ने धूळ चारली. सामन्यात एकमात्र गोल ३७ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या होप राल्फ हिने केला.

भारत-न्यूझीलंड सामन्यातील एक क्षण...

याआधी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाला ४-० ने धूळ चारली होती. मात्र, आज भारताला १-० ने पराभूत व्हावे लागले.

राणी रामपाल

भारतीय संघाने आक्रमक सुरूवात केली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी मिळाला. मात्र, यावर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. यानंतर संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले.

भारत-न्यूझीलंड सामन्याचा निकाल...

भारतीय महिला हॉकी संघाचा पुढील सामना ४ फेब्रुवारीला इंग्लंडशी होणार आहे.

हेही वाचा -भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती

हेही वाचा -हॉकी : नेदरलँड, कॅनडा संघ टोकियो ऑलंम्पिकसाठी पात्र

ABOUT THE AUTHOR

...view details