नवी दिल्ली -ऑलिम्पिक कोटा मिळवणारी भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) याबाबत माहिती दिली. इटलीला जाण्यापूर्वी लवलीना आसाममध्ये तिच्या घरी गेली होती. परत येताना तिची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन कोरोना पॉझिटिव्ह - women's boxer corona news
महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) याबाबत माहिती दिली.
महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन कोरोना पॉझिटिव्ह
"लवलीनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ती इटलीला जाण्यापूर्वी आसाममध्ये आईच्या घरी गेली. ११ दिवसाच्या सुट्टीनंतर ती ११ ऑक्टोबरला परत आली. तिची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली होती. पण १५ ऑक्टोबरला ती पॉझिटिव्ह आढळली आहे", असे प्राधिकरणाने सांगितले.
सध्या लवलीना गुवाहाटीहून परत आल्यानंतर आयसोलेशनमध्ये आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ ५२ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी इटलीला जाणार आहे.