महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेन, पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा विश्वास

टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी भरपूर तयारी केली आहे. मागील ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहता आणि त्यानंतरची कामगिरीचा चढता आलेख पाहता यावेळी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच सुवर्णपदकाची कमाई करणार, असा निर्धार भारताचा पॅरा जलतरणपटू सुयश जाधव याने व्यक्त केला.

यंदा ऑलिम्पिकमध्ये गोड मेडल मिळेल - पॅरा ऑलिम्पिकपटू सुयश जाधव.
यंदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेन, पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा विश्वास

By

Published : Jun 23, 2021, 4:33 PM IST

पुणे - येत्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी भरपूर तयारी केली आहे. मागील ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहता आणि त्यानंतरची कामगिरीचा चढता आलेख पाहता यावेळी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच सुवर्णपदकाची कमाई करणार, असा निर्धार भारताचा पॅरा जलतरणपटू सुयश जाधव याने व्यक्त केला.

पॅरा जलतरणपटू सुयश जाधव बोलताना...
ध्रुवतारा फाऊंडेशन व अर्चर्स अकॅडमीतर्फे ऑलिम्पिक दिनानिमित्त ऑलिम्पिक पदकाचे पूजन व ऑलिम्पिकपटूचा गौरव पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
येणाऱ्या काळात नक्कीच आपण सुवर्णपदक जिंकू
पुणे शहराने या देशाला विविध खेळात, अनेक खेळाडू दिले. क्रीडा क्षेत्रात पुण्याला एक वैभवशाली प्रतिमा आहे. येणाऱ्या पुढील काळात आपण ही ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदक जिंकू आणि आपल्या शहरासह देशाचे नावही पुढे नेऊ, असे यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
यंदा ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणार
ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठी मी चांगली तयारी करत आहे. दररोज सकाळ संध्याकाळ वर्क आउट, सराव, त्यांचबरोबर आहार आणि डॉक्टर तसेच फिजिथेरेपी यांच्या सल्ल्यानुसार सर्व तयारी सुरु असून नक्कीच येणाऱ्या या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणार आहे, असा विश्वास यावेळी सुयश जाधव याने व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details