नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाने किर्गिझ प्रजासत्ताकचा २-० ने पराभव करून तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा २०२३ जिंकली आहे. मंगळवारी मणिपूरमधील इम्फाळ येथील खुमन लम्पक स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये 30,000 प्रेक्षक उपस्थित होते. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत शानदार विजय प्राप्त केला. सेंट्रल बॅक संदेश झिंगानने 34व्या मिनिटाला किर्गिझ संघाविरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारताने लागोपाठ 2 गोल करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली.
झिंगनने कोणतीही चूक केली नाही :ब्रँडन फर्नांडिस झिंगानला फुटबॉल पास केला. झिंगनने कोणतीही चूक केली नाही आणि चेंडू सहजपणे गोलमध्ये मारला. किक इतकी वेगवान होती की, किर्गिस्तानचा गोलरक्षक तोकोताएव एरजान पाहतच राहिला. भारताकडून दुसरा गोल 84व्या मिनिटाला झाला. विजयानंतर भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले, संघाच्या सर्व खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. आवश्यक तो निकाल लावण्यात संघाला यश आले. विजयानंतर कर्णधार सुनील छेत्री म्हणाले की, त्याने आणि संपूर्ण संघाने इम्फाळमध्ये खेळण्याचा अतिव आनंद लुटला. प्रेक्षकांनी संघाला भरभरून साथ दिली, त्यामुळे संपूर्ण सामन्यात खेळाडूंचा उत्साह दिसून आला.