कोलकाता: भारतीय फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला ( India Team Qualify for Asian Cup ) आहे. आशिया चषक पात्रता फेरीत पॅलेस्टाईनने फिलिपाइन्सविरुद्ध 4-0 असा विजय नोंदवला. तसेच भारताने अफगाणिस्तान आणि कंबोडियाचा पराभव केला होता.
भारतीय फुटबॉल संघाने सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषकात प्रवेश केला ( Entered the AFC Asian Cup ) आहे. एएफसी आशियाई चषक 2023 मध्ये खेळवला जाणार आहे. पॅलेस्टाईनने फिलीपिन्सविरुद्ध 4-0 असा शानदार विजय नोंदवला आणि या विजयासह भारत पात्र ठरला. भारताने पात्रता फेरीत अफगाणिस्तानचा 2-1 ने पराभव केला, तर कंबोडियाविरुद्ध 2-0असा विजय नोंदवला.
फिलीपिन्सवर पॅलेस्टाईनचा विजय म्हणजे पॅलेस्टाईन थेट 24 सांघिक फायनलसाठी पात्र ठरले. कारण ते गटात अव्वल होते, तर फिलीपिन्स चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर असूनही बाहेर पडले. सहा पात्रता गटांपैकी फक्त अव्वल संघ थेट पात्र ठरतात. याशिवाय त्यांच्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम संघालाही पुढे जाण्याची संधी मिळते.
भारताचे ड गटात सहा गुण आहेत आणि गोल फरकात हाँगकाँगच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. शेवटच्या गट सामन्यापूर्वीच भारत पात्र ( India Qualify for Asian Cup 2023 ) ठरला. आशियाई चषक स्पर्धेसाठी भारत सलग दुसऱ्यांदा पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो 2019 च्या ग्रुप लीगमधून बाहेर झाला होता. 1964, 1984, 2011, 2019 आणि आता 2023 मध्ये भारत एकूण पाचव्यांदा या खंडीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. भारतीय फुटबॉल संघाने सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषकात प्रवेश केला आहे. एएफसी आशियाई चषक 2023 मध्ये खेळवला जाणार आहे. आशिया कप पात्रता फेरीत भारताने अफगाणिस्तान आणि कंबोडियाचा पराभव केला होता.
हेही वाचा -IPL Media Rights 2023-2027 : दोन स्वतंत्र प्रसारकांना मिळाले भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकार