काठमांडू -कुस्तीपटू आणि जलतरणपटूंच्या विजयी वाटचालीमुळे भारताने १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताला २२ सुवर्ण, १० रौप्य, आणि ६ कांस्यपदके अशी ३८ पदके मिळाली असून एकूण पदकसंख्या २५२ इतकी झाली आहे.
हेही वाचा -टेटे : मार्कहॅममध्ये विजेतेपद जिंकून मानवने रचला इतिहास
भारत आता १३२ सुवर्ण, ७९ रौप्य आणि ४१ कांस्यपदकांसह प्रथम तर, नेपाळ ४५ सुवर्ण, ४४ रौप्य, ७६ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. सातव्या दिवशी भारताच्या जलतरणपटूंनी ७ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकली, तर कुस्तीपटूंनी ४ सुवर्णपदके जिंकली आहेत.
हँडबॉलच्या महिला विभागात भारताने सुवर्ण व रौप्यपदक जिंकले तर पुरुष गटानेही रौप्यपदक पटकावले. रविवारी भारताने तलवारबाजीत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत.