नवी दिल्ली -टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठी भारताच्या पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने निरोप कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित राहत खेळाडूंचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमाला जी. किशन रेड्डी, मिनाश्री लेखी, खासदार कृष्ण कपूर, पीसीआयचे सचिव गुरूशरण सिंह, पीसीआय अध्यक्षांसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनुराग ठाकूर या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मला विश्वास आहे की, पॅरा अॅथलिट टोकियोत चांगले प्रदर्शन करतील. देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला कल्पना आहे की, तुम्ही तुमच्या कामगिरीच्या जोरावर देशाचे झेंडा उंचीवर घेऊन जालं.
सद्याची परिस्थिती पॅरा अॅथलिटसाठी कठीण आहे. परंतु तुमचे पॅशन तुम्हाला खेळात विजयी करण्यास मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याशी बोलतील आणि पॅरालिम्पिकनंतर ते अॅथलिटना भेटणार देखील आहेत. मोदींनी नेहमी खेळाडूंचे मनोबल वाढवलं आहे. तुम्ही जावा आणि कोणतही दडपण न घेता चांगली कामगिरी करत पदकं जिंका, असे देखील ठाकूर म्हणाले.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकला जाणारे अॅथलिट या कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले होते. खेळाडू सद्या बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे ते अशा कार्यक्रमात स्पर्धा संपेपर्यंत सहभागी होऊ शकत नाहीत.