महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Novak Djokovic Statement : यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा - नोव्हाक जोकोविच - 21 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविच

नोव्हाक जोकोविचला ( Tennis Star Novak Djokovic ) वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कारण 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती.

Novak  Djokovic
Novak Djokovic

By

Published : Jul 12, 2022, 7:02 PM IST

सर्बिया: 21 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला ( 21-time Grand Slam champion Novak Djokovic ) पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळेल असा विश्वास आहे. सातवे विम्बल्डन विजेतेपद आणि 21वी ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्बियन खेळाडूने कबूल केले की यूएस ओपनसाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही. कारण, टूर्नामेंटमध्ये फक्त अशाच खेळाडूंना परवानगी दिली जाईल, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जोकोविचने स्पष्ट केले आहे की त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.

जोकोविचला वर्षाच्या सुरुवातीला मोठा धक्का बसला. कारण त्याला 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात ( Novak Djokovic banned Australian Open 2022 ) आली. वास्तविक, त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. मात्र, जोकोविचला खात्री आहे की त्याच्यावर ऑस्ट्रेलियन बंदी उठवली जाईल आणि यूएस ओपनबाबत त्याला खात्री नाही. बेलग्रेड सिटी हॉलमधील समारंभानंतर जोकोविचने आरटीएसला सांगितले की, "मी ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करू शकत नाही, परंतु मला सकारात्मक बातमी मिळण्याची आशा आहे."

मला विश्वास आहे की ऑस्ट्रेलियन ओपनसाठी गोष्टी बदलतील. यूएस ओपनसाठी जास्त वेळ नाही. मला यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन खेळायचे आहे, पण मी जरी खेळलो नाही तरी जगाचा अंत नाही. विम्बल्डननंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ( Novak Djokovic Statement ) तो म्हणाला की, मी लवकरच कोणतीही स्पर्धा खेळेन की नाही, हे निश्चित नाही, परंतु पुढील काही आठवडे मी विश्रांती घेईन. कारण गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्यासाठी खूप थकवणारे होते. मात्र, मला येथे जे काही मिळाले आहे, त्यात मी आनंदी आहे.

हेही वाचा -ENG vs IND 1st ODI : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ABOUT THE AUTHOR

...view details