नई दिल्ली:सध्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला भारत, 11 आणि 12 जून रोजी अँटवर्पमध्ये बेल्जियमशी खेळेल. यानंतर 18 आणि 19 जून रोजी रॉटरडॅम येथे नेदरलँड्सविरुद्ध सामना होणार आहे. संघाचा कर्णधार अमित रोहिदास ( Captain Amit Rohidas ) तर उपकर्णधार हरमनप्रीत सिंग असेल. 20 सदस्यीय संघात गोलरक्षक सूरज करकेरा, श्रीजेश परट्टा रवींद्रन, बचावपटू सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांचा समावेश आहे.
मिडफिल्डमध्ये अनुभवी मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा यांचा समावेश आहे. तर फॉरवर्ड लाइनमध्ये गुरजंत सिंग, मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक यांचा समावेश आहे.
संघाबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड ( Head Coach Graham Reed ) म्हणाले, "एफआयएच हॉकी प्रो लीगचा ( FIH Hockey Pro League ) हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल संघांविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सामने होतील. भारतातील योजना घरच्या सामन्यांमधून आमची गती घेण्याचा आहे.''