नवी दिल्ली- भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिने आसाममध्ये आलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आपली अर्धी पगार देण्याचे जाहीर केले आहे. तिने एक ट्विट करत यांची घोषणा केली. हिमा दास चेक गणराज्यमध्ये सुरू असलेल्या क्लांदो मेमोरियल अॅथलॅटिक्स मीट स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे.
ब्रम्हपुत्रा नदीला पूर आल्याने, आसाममधील ३० जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे तब्बल 43 लाख लोक बाधित झाले असून 80 हजार हेक्टर पिके पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. यामुळे आसामचीच रहिवाशी असलेल्या हिमा दास हिने आपली अर्धी पगार देण्याचे जाहीर केले.