नवी दिल्ली -भारताची विक्रमवीर आणि आघाडीची धावपटू हिमा दासने आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. चेक गणराज्य येथे सुरु असलेल्या यंदाच्या एथलेटिकी मिटिनेक रीटरमध्ये हिमाने सुवर्णपदक जिंकले आहे.
हिमा दासची विक्रमी घोडदौड सुरुच, जिंकले सहावे सुवर्ण - निर्मल टॉम
हिमाने महिलांच्या ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर, भारताच्याच मोहम्मद अनासनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली.
हिमाने महिलांच्या ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर, भारताच्याच मोहम्मद अनासनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यंदासाठी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या अनासने पुरुषांच्या ३०० मीटरमध्ये हे पदक जिंकले.
हिमाने आणि मोहम्मद अनासने ट्विटरवर या कामगिरीची माहिती दिली. 'हा आनंद एथलेटिकी मिटिनेक रीटरमध्ये ३२.४१ सेकंदासह सुवर्णपदक जिंकण्याचा आहे', असे अनासने म्हटले आहे. तर, दोन जुलैनंतर हिमा दासचे हे युरोपमधील सहावे सुवर्णपदक आहे. पुरुषांमध्ये अनास व्यतिरिक्त, निर्मल टॉमने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ३३.०३ सेकंदासह तो या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला आहे.