अहमदाबाद -विकास खंडोलाने कमवलेल्या दमदार १२ गुणांच्या जोरावर हरियाणा स्टीलर्सने बंगळुरु बुल्सवर मात केली आहे. बंगळुरु बुल्सचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर, हरियाणाचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.
प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात रंगलेल्या या सामन्यात हरियाणाने ३३-३० असा विजय मिळवला. हरियाणाने यंदाच्या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. विकासने या लीगमध्ये आपल्या चढाईच्या २०० गुणांचे खाते पूर्ण केले. पहिल्या सत्रात बंगळुरुचा संघ १७-१६ अशा फरकाने पुढे होता.