महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

National Bank Open हालेपने तिसऱ्यांदा नॅशनल बँक ओपनचे विजेतेपद पटकावले - जागतिक टेनिस न्यूज

रोमानियाची स्टार टेनिसपटू सिमोना हालेपने Star tennis player Simona Halep नॅशनल बँक ओपनच्या अंतिम सामन्यात ब्राझीलच्या बिट्रिझ हदाद माईयाचा पराभव करत तिचे 24 वे WTA टूर एकेरीचे विजेतेपद पटकावले.

Simona Halep
सिमोना हालेप

By

Published : Aug 15, 2022, 6:05 PM IST

टोरंटो रोमानियाची स्टार टेनिसपटू सिमोना हालेपने Tennis player Simona Halep नॅशनल बँक ओपनचे National Bank Open विजेतेपद पटकावले आहे. दोन वेळची ग्रँडस्लॅम विजेती हालेपने अंतिम फेरीत ब्राझीलच्या बिट्रिझ हदाद माईयाचा 6-3, 2-6, 6-3 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासह हालेपने अव्वल 10 क्रमवारीत आपले स्थान निश्चित केले आहे. दोन तास आणि 16 मिनिटे चाललेल्या या सामन्यात बिट्रिजने पहिल्या सेटच्या पहिल्या 20 मिनिटांत माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या हॅलेपवर 3-0 अशी आघाडी घेतली, परंतु हालेपने जबरदस्त पुनरागमन करत सलग सहा गेम जिंकून सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये बिट्रिजने Beatriz Haddad Maia 4-0 अशी आघाडी घेतली आणि तो 6-2 ने जिंकला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये हालेपने सुरुवातीपासूनच दबदबा दाखवत सेटसह सामना जिंकला. ओपन एरामध्ये तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावणारी सिमोना हालेप ही पाचवी खेळाडू आहे. तिच्या आधी ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोवा आणि सेरेना विल्यम्स यांनी हा पराक्रम केला आहे. हालेपच्या कारकिर्दीतील हे एकूण 24 वे विजेतेपद आहे. हालेपने 2016 आणि 2018 मध्येही हे विजेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, ब्राझीलच्या बीट्रिझची ही पहिली WTA 1000 फायनल होती.

हेही वाचाइंडिया नाव नको तर देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान ठेवण्याची क्रिकेटर शमीच्या बायकोची पंतप्रधान मोदींकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details