हैद्राबाद :भारतीय संघाचा आघाडीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने त्याच्या कारकिर्दीत छान क्रिकेट खेळले आहे. परंतु आता तो सध्या तो एका व्हिडीओने चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शिखर धवनला विचारते, भाऊ तुझा व्हॅलेंटाईन डे प्लॅन काय आहे?" त्यावर या स्टार क्रिकेटर शिखर धवनने मजेशीर उत्तर दिले आहे. शिखर म्हणतो, 'अगर किस्मत में ना लिखी हो परी, तो किस बात की 14 फेब्रुवारी' म्हणजे नशिबात एखादी सुंदर परी नसेल तर, 14 फेब्रुवारीला काय अर्थ आहे, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.
तडफदार फलंदाज :शिखर धवन सध्या भारतीय संघाबाहेर आहे. अनुभवी डावखुरा सलामीवीर गेल्या काही वर्षांत पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये भारतासाठी मोठी खेळी करणारा तडफदार फलंदाज ठरला आहे. तथापि, सध्या संघ व्यवस्थापन एकदिवसीय सामन्यांमध्ये तरुण पर्यायांचा शोध घेत आहे. याचा अर्थ असा की, धवनला पुनरागमनाची काही आशा असेल, तर त्याच्या हातात काम आहे. तो अजूनही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळत आहे आणि छाप सोडण्यास उत्सुक असेल. दरम्यान, धवनने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कॅप्शन लिहले आहे." किस बात की 14 फेब्रुवारी (14 फेब्रुवारीचा मुद्दा काय आहे)?
वनडे मालिकेत मोठी कामगिरी :बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत धवनने भारतीय संघाची कमान संभाळली होती. जिथे पाहुण्यांना तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. तिसर्या सामन्यात त्याने पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावल्यानंतर इशान मालिकेचे आकर्षण ठरले आहे. धवनसाठी ही मालिका विस्मरणीय ठरली कारण त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ 18 धावा केल्या. परिणामी त्याला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी संघातून वगळण्यात आले.