हैदराबाद - लाल मातीचा बादशाह स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने 14 व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. राफेलने 22 वी ग्रँडस्लँम स्पर्धा जिंकली आहे. नॉर्वेतील कॅस्पर रुद या प्रतिस्पर्ध्यावर नदालने 6-3, 6-3, 6-0 अशी मात केली ( Rafael Nadal beats Casper Ruud ) आहे.
कॅस्पर रुदने सेमिफायनलमध्ये क्रोएशियाच्या मारिन सिचिचलला हरवून अंतिम फेरी गाठली होती. तर, नदाल आणि जर्मन प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्हच्या यांच्यात उपांत्य फेरी सामना झाला होता. त्या सामन्यात झ्वेरेव्हच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे झ्वेरेव्हीने या सामन्यातून माघार घेतल्याने नदाल अंतिम फेरीत दाखल झाला होता.
अंतिम फेरीत राफेल नदाल आणि कॅस्पर रुद यांच्यात तीन सेट सामने झाले. सुरुवातीपासूनच राफेलने या सामन्यावर आली पकड ठेवली होती. या सामन्यात 6-3, 6-3, 6-0 अशी मात नदालने रुदवर केली. नदालने यंदा 21 वी ग्रँडस्लँम स्पर्धा जिंकली स्पर्धा जिंकली होती. त्याची 22 व्या ग्रँडस्लँम स्पर्धेवर नजर होती.
14 वेळा जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा - राफेल नदाल हा फ्रेंच ओपन स्पर्धेचा राजा बनला आहे. त्याने 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धेवर आपले नाव कोरलं आहे. यापूर्वी राफेलने 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. राफेलने यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही आपल्या नावावर केली आहे.
हेही वाचा -French Open 2022 : कॅरोलिन-क्रिस्टीना यांनी पटकावले फ्रेंच ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद