महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2022, 4:21 PM IST

ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: जाणून घ्या आज होणाऱ्या सामन्यांबद्दल सर्वकाही

फिफा विश्वचषकात (FIFA World Cup 2022) आज चार सामने होणार आहेत. जाणून घ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची आकडेवारी. (Today FIFA matches timings).

Etv Bharat
Etv Bharat

दोहा :फिफा विश्वचषकात (FIFA World Cup 2022) आज चार सामने होणार आहेत. जाणून घ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची आकडेवारी. (Today FIFA matches timings).

वेळ: 3:30

वेल्स विरुद्ध इराण (ब गट)

स्टेडियम:अहमद बिन अली स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत वेल्स 19 व्या स्थानावर आहे तर इराण 20 व्या स्थानावर आहे.

हेड-टू-हेड:वेल्स 1, इराण 0

शेवटचा सामना:वेल्स विरुद्ध यूएसए सामना 1-1 ने बरोबरीत राहिला तर इराणला इंग्लंडकडून 2-6 ने पराभव पत्करावा लागला.

संघाची विश्वचषकातील कामगिरी:वेल्सचा एक विजय, 4 अनिर्णित आणि एक पराभव. इराणचे दोन विजय, 4 अनिर्णित आणि 10 पराभव आहेत.

---

वेळ: 6.30

कतार विरुद्ध सेनेगल (गट अ)

स्टेडियम: अल थुमाना स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत कतार 50व्या क्रमांकावर आहे तर सेनेगल 18 व्या क्रमांकावर आहे.

हेड-टू-हेड: स्पर्धेत प्रथमच दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.

शेवटचा सामना: कतारला शेवटच्या सामन्यात इक्वेडोरकडून 0-2 असा पराभव पत्कारावा लागला तर सेनेगलला नेदरलँड्सने ०-२ असे हरविले होते.

संघाची विश्वचषकातील कामगिरी :कतारचा हा पहिलाच वर्ल्डकप असूनकतारनेस्पर्धेत अद्यापएकहीसामना जिंकलेला नाही. दुसरीकडे, सेनेगलने विश्वचषकात आत्तापर्यंत 3 सामने जिंकले असून त्यांना तितकेच पराभव देखील पत्करावे लागले आहेत.

---

वेळ: सकाळी 9:30

नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर (गट अ)

स्टेडियम: खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत दोन्ही संघांमध्ये प्रचंड अंतर आहे. क्रमवारीत नेदरलँड 8 व्या तर इक्वेडोर 44 व्या क्रमांकावर आहे.

हेड-टू-हेड: दोन्ही संघ आत्तापर्यंत दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. नेदरलँडने एक सामना जिंकला आहे तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2014 विश्वचषकात नेदरलँड्स 1-0 ने जिंकला होता 2006 मध्ये सामना 1-1 बरोबरीत संपला होता.

शेवटचा सामना: नेदरलँडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सेनेगलचा 2-0 असा पराभव केला आहे तर इक्वाडोरनेही यजमान कतारचा 2-0 असा पराभव केला आहे.

संघाची विश्वचषकातील कामगिरी : नेदरलँड्सने विश्वचषकात आत्तापर्यंत 11 पराभवांसह 28 विजय आणि 12 अनिर्णित सामने खेळले आहेत. तर इक्वेडोरचे आत्तापर्यंत 5 विजय आणि 5 पराभव असून एक सामना 1 अनिर्णित राहिला आहे.

---

वेळ: 12:30 AM (शनिवार)

इंग्लंड विरुद्ध यूएसए

स्टेडियम:अल बायत स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत इंग्लंड स्पर्धेतील 5 व्या क्रमांकावर असून यूएसए 16 व्या स्थानावर आहे.

हेड-टू-हेड: इंग्लंडने 8 सामने जिंकले आहेत, तर यूएसए दोनदा जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2018 मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती जिथे इंग्लंडने यूएसएचा 3-0 असा धुव्वा उडवला होता. या आधी, 2010 मध्ये सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.

शेवटचा सामना: आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने इराणचा ६-२ असा पराभव केला, तर यूएसएने वेल्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली.

संघाची विश्वचषकातील कामगिरी : इंग्लंडचे विश्वचषकात आत्तापर्यंत ३० विजय, २१ अनिर्णित आणि १९ पराभव आहेत. तर युएसएचे 8 विजय, 7 अनिर्णित आणि 19 पराभव आहेत.

(FIFA World Cup 2022) (Today FIFA matches timings).

ABOUT THE AUTHOR

...view details